बाजारपेठ पोलिसांनी केली कारवाई
कल्याण : केंद्र व राज्य शासनाने कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लागु केलेल्या संचारबंदी ओदशाचा भंग करणाऱ्या १७ इसमांविरुध्द कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करुन त्यांना जेरबंद केले आहे.
गुरुवारी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हट्दीत संचारबंदीचा भंग करणारे दुकानदार व रस्त्यावर विनाकारण बाहेर फिरणारे नागरीक अशा एकुण १७ इसमांविरुध्द भा.द वि.कलम १८८ प्रमाणे एकूण १० गुन्हे दाखल केले असुन या इसमांना ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई केली आहे. यापुर्वी पोलीस ठाणे हद्दीत नागरीकांना लाऊड स्पीकरव्दारे वेळोवेळी सुचना प्रसारीत केलेल्या असतांना सुध्दा नागरीकांनी संचारबंदीचा भंग केला म्हणून सदरची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, सपोनि प्रमोद सानप, अविनाश वनवे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांनी केली असुन पुढील तपास चालु आहे. सर्व नागरीकांनी संचारबंदी आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी केले आहे.