पोलिसांना मास्क, सॅनिटायजर आणि हॅण्ड गलोजचे केले वाटप
कल्याण : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून भारतात देखील याचे प्रमाण वाढत आहे. तो रोखण्यासाठी भारतात संचारबंदी लागू केली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि इतर अनेकजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कल्याण शिव भीम मिठाई मावा व्यापारी संघटनेने एक हात मदतीचा दिला असून संघटनेचे अध्यक्ष सागर पगारे, सेक्रेटरी जयदीप सानप, कार्यकर्ते राजा जाधव, रॉकी राजपूत, जूम्मी शेख, रोहन अग्रवाल यांच्यासह इतर सर्व मावा व्यापारी यांच्या पुढाकाराने एक हात मदतीचा म्हणून ३०० मास्क, १५० सॅनिटायजर बॉटल, ८०० हॅण्ड गलोजचे वाटप करण्यात आले
देशात संचारबंदी लागू असतांना पोलीस, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य अधिकारी सर्व मंत्री मंडळ, सर्वच अधिकारी कर्मचारी नागरिकांकरिता २४ तास ड्युटीवर हजर आहेत. असे असताना ड्युटी करतांना त्यांना कोरोना लागण होण्याची शक्यता असून यासाठीच समाजाचा एक घटक नागरिक म्हणून असलेल कर्तव्य पार पाडण्यासाठी कल्याण शिव भीम मिठाई मावा व्यापारी संघटनेच्या वतीने महात्मा चौक पोलिस स्टेशन, खडकपाडा पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कार्यालय या ठिकाणी ३०० मास्क, १५० सॅनिटायजर बॉटल, ८०० हॅण्ड गलोज याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती समाजसेवक जयदीप सानप यांनी दिली.